सेऊल : उत्तर कोरियाची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका दक्षिण कोरियाजवळ तैनात केली आहे. दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिका या तीन देशांच्या सागरी युद्धसरावासाठी यूएसएस थिओडोर रुझवेल्ट ही युद्धनौका दक्षिण कोरियाजवळ आणण्यात आली असल्याचे सांगण्यात येते आहे. उत्तर कोरियाने रशियाबरोबर संरक्षण सहकार्य करार केल्यामुळे त्या देशांची आक्रमकता आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कराराबद्दल जाब विचाण्यासाठी दक्षिण कोरियाने रशियाच्या राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये पाचारण केले होते. यावेळी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यात गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या संरक्षण कराराचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्याच्या दसऱ्याच दिवशी अमेरिकेची युद्धनौका दक्षिण कोरिजवळ तैनात झाली.