नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबतच्या आक्षेपार्ह डान्सवरून उर्वशी ट्रोल; म्हणाली ‘कला…’

Urvashi Rautela | अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि नंदमुरी बालकृष्ण यांचा ‘डाकू महाराज’ या चित्रपटातील ‘दाबी दिबिडी’ गाण्याची सध्या चर्चा होत आहे. या गाण्यात 64 वर्षीय बालकृष्ण यांनी 30 वर्षीय उर्वशीसोबत विचित्र डान्स केला आहे. ज्यानंतर उर्वशी आणि बालकृष्ण यांना ट्रोल करण्यात आले. यानंतर या गाण्यात नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत डान्स करण्याचा अनुभव उर्वशी रौतेलाने शेअर केला.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना उर्वशी म्हणाली, “काम करत असताना वेगवेगळ्या चर्चा आणि विविध मते यांचा सामना कलाकारांना करावा लागतो. हा आमच्या या क्षेत्रातील प्रवासाचा एक भाग आहेत. नंदमुरी यांच्यासोबतच्या नृत्याबद्दल समोर येणाऱ्या विविध दृष्टिकोनांचा मी आदर करते. त्यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करणे हा एक मोठा सन्मान आहे.” Urvashi Rautela |
उर्वशी रौतेलाने या गाण्याच्या डान्समध्ये केलेल्या वादग्रस्त मूव्ह्सचे कला म्हणून वर्णन केले. “नंदमुरी सरांसोबतचा डान्स करणे हा माझ्यासाठी फक्त एक सादरीकरण नव्हे तर कलेचा भाग आहे. त्यांच्यासोबत काम करणे हे स्वप्नपूर्ती सारखे आहे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक स्टेप, प्रत्येक हावभाव हे काहीतरी सुंदर निर्मितीसाठीच होते,’ असे तिने म्हंटले आहे. Urvashi Rautela |
View this post on Instagram
दरम्यान, ‘डाकू महाराज’ या चित्रपटात नंदमुरी बालकृष्ण आणि उर्वशी रौतेलासह बॉबी देओल, श्रद्धा श्रीनाथ, प्रज्ञा जैस्वाल, मकरंद देशपांडे यांच्या देखील भूमिका आहेत. 12 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात 22 कोटींची ओपनिंग केली आहे. तर या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये आहे.
हेही वाचा:
ना घर आणि ना गाडी, रोख रक्कम केवळ 50 हजार; अरविंद केजरीवाल यांची एकूण संपत्ती किती?





