कांतारा 2 मध्ये उर्वशी रौतेला दिसणार का ? कास्टिंगबाबत दिग्दर्शक रिषभ शेट्टी म्हणाला “एक सेल्फी पाहून तुम्ही…”

मुंबई – कांताराच्या दुसऱ्या पार्टमधे अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एंट्री झाली असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.त्याला कारणही तसेच होते. उर्वशीने रिषभ शेट्टी सोबतची एक पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता स्वतः दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टीने याबाबत माहिती दिली आहे.एका मुलाखतीदरम्यान रिषभ शेट्टीने कांतारा २ च्या कास्टिंगबाबत भाष्य केले.
एकीकडे दुसरा भाग हा सिक्वल नसून प्रीक्वल असणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. अशात उर्वशीची या चित्रपटात एंट्री झाल्याने चाहते भलतेच खुश झाले होते. उर्वशीने याबाबत एक इंस्टाग्राम पोस्ट देखील शेअर केली आहे. मात्र आता रिषभ शेट्टीने एका मुलाखतीदरम्यान याबाबत माहिती दिली आहे.
उर्वशी रौतेलाची कांतारामध्ये एंट्री होणार का ? असा थेट सवाल रिषभ शेट्टीला विचारला आला. त्यावर रिषभ शेट्टी म्हणाला,”सोशल मीडियावरील एक सेल्फी पाहून तुम्ही काहीही ठरवू नका.. आताशी चित्रपट लिहीत आहे त्यानंतर सर्व अनाउन्समेंट करेल” असं रिषभ शेट्टी यावेळी म्हणाला.
View this post on Instagram
रिषभ शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कांतारा’ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर असाक्षरशः राज्य केले. भारतासह जगभरात कांताराने जबरदस्त कमाई केली.हा चित्रपट 2022 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. ‘कांतारा’ चित्रपटाने अभिनेता-दिग्दर्शक रिषभ शेट्टीला देशभरात रातोरात स्टार बनवले. यानंतर ऋषभ शेट्टीने कांतारा 2 ची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांना मोठा आनंद झाला.





