Urvashi Rautela : ‘आधी गाणं डिलीट करा….’; नंदामुरी बालकृष्ण, उर्वशी रौतेलाचा ‘तो’ डान्स पाहून नेटकरी भडकले !

Urvashi Rautela | Nandamuri Balakrishna | Daaku Maharaaj : दाक्षिणात्य सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते नंदामुरी बालाकृष्ण आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या आगामी ॲक्शन थ्रिलर ‘डाकू महाराज’ सिनेमाची सध्या चांगलाच चर्चेत आहे. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांची मुख्य भूमिका आहेत.
नुकतंच या सिनेमातील ‘दबिडी दिबिडी’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून यामध्ये उर्वशी-बालाकृष्ण यांच्यातील रोमान्स आणि काही बोल्ड डान्स स्टेप पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. गाण्यातील सर्व गोष्टींवर नेटकरी टीका करत आहेत.
सोशल मीडियावर शेखर मास्टर यांच्या कोरिओग्राफीला ‘अश्लील’ म्हटले जाते आहे आणि या नृत्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘नंदमुरी बालकृष्ण आणि उर्वशी रौतेला यांच्या वयातील अंतराचा तरी मान राखून कोरिओग्राफी करायला हवी होती’ असं नेटकरी म्हणतात आहेत.
“64 वर्षांचा अभिनेता त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत असा आक्षेपार्ह डान्स करतोय. हिरोने तरी याला सहमती कशी दिली” असा सवाल नेटकरी करत आहेत. वाग्देवीनं हे गाणं गायलं असून कासरला श्याम यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. तर एस. तमन यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय.
मात्र, आता बॉलिवूड चाहत्यांनीही या साऊथच्या सिनेमातील डान्सवर तिखट शब्दात टीका केली असल्याचं दिसून येत आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड करत आहे.
What on earth did I just watch? 🤮🤮 A grown man dancing so inappropriately with someone who could be his daughter?
Who even comes up with such ‘genius’ choreography, and why did the hero agree to this? Absolutely disgusting🙏🏻🙏🏻#DabidiDibidi #DaakuMaharaaj pic.twitter.com/BlENomwL0A
— Mastikhor 🤪 (@ventingout247) January 2, 2025
‘या’ दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित
‘डाकू महाराज’ हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचित्रपटात अभिनेता बॉबी देओल, उर्वशी रौतेला, प्रज्ञा जैस्वाल आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्यासह इतर कलाकार देखील असणार आहेत. तर ‘डाकू महाराज’ या चित्रपटात अभिनेता बालकृष्णा डाकूच्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.





