Urmila Nimbalkar : “स्वतःच्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम येतो आणि…”; उर्मिला निंबाळकर करणार नवी सुरुवात?
Urmila Nimbalkar : 'ब्रँड किंवा प्रॉडक्ट बनवण्याचे साधारण दोन मार्ग असतात'

Urmila Nimbalkar : अभिनेत्री उर्मिला निंबाळकर जरी अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी ती नेहमी चर्चेत असते. स्वतःच्या युट्यूब चॅनलवरून ती लाइफस्टाइल, मेकअप, ट्रॅव्हल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ शेअर करत असते. मात्र आता तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्याद्वारे ती नवा बिझनेस सुरू करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उर्मिलाने पोस्टमध्ये लिहिले की, “ब्रँड किंवा प्रॉडक्ट बनवण्याचे साधारण दोन मार्ग असतात. पहिला म्हणजे मार्केट ड्रायव्हन. बाजारात काय कमी आहे? लोकांना काय हवं आहे? कशाची मागणी जास्त आहे? या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून आपण एक सोल्युशन तयार करतो. हा अप्रोज खूप स्ट्रेटेजिक असतो. असे प्रोडक्ट्स आपलं आयुष्य नक्कीच सोपं करत असतात. पण दुसरा मार्ग थोडा वेगळा आणि खूप पर्सनल असतो.”
पुढे ती म्हणाली, “आपल्या स्वतःच्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम येतो आणि आपण ठरवतो की याचं सोल्युशन मीच शोधणार. इथं तुम्ही अंदाज लावत नाही, तुम्ही तो प्रॉब्लेम रोज जगत असता. आपल्याच आयुष्यात काही तरी कमी पडतंय आणि तो भरून काढण्यासाठी तुम्ही प्रयोग करता, अनेक शक्यता तपासून बघता आणि जोपर्यंत ते प्रोडक्ट खरंच काम करत नाही, तोपर्यंत थांबत नाही”
View this post on Instagram
“खरं प्रोडक्ट मार्केट फिट इथंच मिळतं. कारण तुम्ही फक्त इतरांना विकण्यासाठी काहीतरी बनवत नाही, तर स्वतःचीसुद्धा एक समस्या सोडवत असता आणि मग विन-विन सिच्युएशन तयार होते. व्यवसाय वाढतो कारण तो खऱ्या अर्थाने वॅल्यु देतो आणि कस्टमर टिकून राहतात कारण त्यांना खरंच फायदा होतो. अशा प्रोडक्टमध्ये इतर लोकांनासुद्धा त्यात स्वतःची स्टोरी दिसते”, असेही तिने सांगितलं.
“मी सुद्धा एक आई, क्रिएटर, अभिनेत्री आणि एंटरप्रेनर म्हणून असेच अनेक इश्यू फेस केले आहेत आणि म्हणूनच मी ठरवलं की त्यावर माझं स्वतःचं सोल्युशन शोधायचं. खूप ट्रायल, लर्निंग आणि इम्प्रुव्हमेंटनंतर आता ते सोल्युशन तयार आहे आणि लवकरच ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे”, असं ती म्हणाली.
या पोस्टमध्ये तिने नवा बिझनेस सुरू करत असल्याची कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. तिने फक्त काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यातील एका फोटोमध्ये तिच्या हातात एक पदार्थ दिसत आहे. यावरून ती नवी सुरुवात करणार असल्याचे म्हंटले जात आहे.
हेही वाचा:





