लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिला मातोंडकर पती मोहसिन अख्तरपासून होणार विभक्त?

Urmila Matondkar | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्री आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ती रुपेरी पडद्यावरून लॅब असली तरी आपल्या लाईफचे अपडेट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशात आता उर्मिलाच्या घटस्फोटाची चर्चा सोशलवर चांगलीच रंगली आहे. लग्नाच्या आठ वर्षानंतर अभिनेत्री पती मोहसिन अख्तर मीरपासून घटस्फोट घेत आहे.
लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिला पती मोहसिनला घटस्फोट घेणार असल्याची चर्चेमुळे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहे. उर्मिलाने 3 मार्च 2016 रोजी तिचा दीर्घकाळचा प्रियकर मोहसिन अख्तरसोबत आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यांच्या लग्नावर हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समुदायातून जोरदार टीका झाली होती. तरी उर्मिला आणि मोहसीन दोघांनीही त्याची पर्वा केली नाही. मात्र आता 8 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर या दोघांचे ब्रेकअप होत आहे. हे जोडपे नेहमीच एकमेकांच्या प्रेमात दिसले असले तरी त्यांच्या घटस्फोटाची बातमी अनेकांसाठी धक्कादायक आहे.
रिपोर्टनुसार, उर्मिला मातोंडकरने आधीच कोर्टात घटस्फोट याचिका दाखल केली आहे. तिने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त असले तरी, उर्मिला आणि मोहसीनने त्यांच्या घटस्फोटाबाबत अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
दरम्यान, मोहसीन मुंबईत त्याच्या मॉडेलिंग करिअरच्या कठीण टप्प्यातून जात होता, त्याच काळात तो उर्मिलाला पहिल्यांदा भेटला. 2014 मध्ये, उर्मिला आणि मोहसीन पहिल्यांदा मनीष मल्होत्राची भाची रिद्धी मल्होत्राच्या लग्नात भेटले होते. मोहसीनच्या बाजूने ते प्रथमदर्शनी प्रेम होते. मग, ते एकमेकांना भेटू लागले आणि हळूहळू चांगले मित्र बनले. उर्मिला आणि मोहसीनचे 2016 मध्ये लग्न झाले होते.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०





