मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त राज्यभरातील सिनेमागृहात 26 जुलै रोजी ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ पुन्हा एका प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपटाचा एक शो फ्री दाखवण्याचा आदेश राज्यसरकारने दिला आहे. हा चित्रपट कारगिल विजय दिवसच्या निमित्ताने ५०० चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाच्या टीमकडूनच याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दोन वर्षापूर्वी भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. याच घटनेवर दिग्दर्शक आदित्य धर यांनी ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातून प्रकाशझोत टाकला आहे. चित्रपटात विकी कौशल, यामी गौतमी सह परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच चित्रपटात पाकिस्तानी राजकारण, स्थानिक संघटना, सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये भारतीय सैन्याविषयी होणाऱ्या चर्चा आणि एकंदर वातावरण पाहता पुन्हा एकदा काही घडून गेलेल्या घटना विचारात येतात.