Bhagyashree : माथ्यावर जखमा, चेहऱ्यावर निराशा…; अभिनेत्री भाग्यश्रीला गंभीर दुखापत, कपाळावर केली शस्त्रक्रिया

Bhagyashree । Maine Pyar Kiya : ‘राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन’ म्हणजेच अभिनेत्री ‘भाग्यश्री’ सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांची ती मुलगी. पण या अभिनेत्रीला सर्वजण ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील सुस्वभावी आणि संस्कारी मुलगी म्हणून आज ही ओळखतात.
या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री ‘भाग्यश्री’ने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली होती. भाग्यश्रीने आजही प्रेक्षकांच्या मनात आपली जागा तशीच कायम ठेवली आहे.अभिनेत्री भाग्यश्री बद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.
पण या अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. पिकलबॉल खेळत असताना भाग्यश्री जखमी झाली. त्यावेळी तिच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर तिला लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आलं.
दुखापत इतकी गंभीर होती की भाग्यश्रीवर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तिच्या कपाळावर जवळपास 13 टाके पडले आहेत. तर भाग्यश्रीचे रुग्णालयातील काही फोटो समोर आले आहेत. त्या फोटोंमधून तिला झालेली गंभीर दुखापत दिसून आली आहे.
View this post on Instagram
एका फोटोमध्ये भाग्यश्री हे रुग्णालयाच्या बेडवर झोपली आहे आणि डॉक्टर तिचं स्टीचिंग करत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये डॉक्टर हे भाग्यश्रीच्या कपाळावर एक मोठा कट साफ करत असल्याचे दिसत आहे. आणखी एक फोटो आहे ज्यात भाग्यश्रीच्या कपाळावर बॅन्डेज असल्याचं दिसतंय आणि तरी देखील ती हसताना दिसते.
भाग्यश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांचे कमेंट्स येत आहेत. तिच्या चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
दरम्यान, अभिनेत्री भाग्यश्री बद्दल बोलायचे झाल्यास भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969ला शाही पटवर्धन कुटुंबात झाला. तिचे पूर्ण नाव ‘राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन’ आहे. सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांची ती मुलगी आहे.
तिने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून सर्वांची मने जिंकले आहेत. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. यानंतर ती ‘त्यागी’, ‘जन-जाम का साथ’, ‘देवा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे, तर आता ती तेलुगू हिंदी चित्रपट ‘राधे श्याम’मध्ये दिसली आहे.





