अभिनेत्रीने भामट्याला घडवली अद्दल

मुंबई – उर्फी जावेद ही अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यामुळे अनेकजण तिला सोशल मीडियावर कमेंटसह मेसेज करत असतात. अशाच एका अश्लील भाषेत मेसेज करणाऱ्या वेड्या चाहत्याला उर्फीने धडा शिकवला आहे. उर्फीने थेट पोलिसात तक्रार करत या भामट्याला अटक करवून चांगलीच अद्दल घडवली आहे.
काही दिवसांपूर्वी उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टच्या माध्यमातून उर्फीने एका व्यक्तीविरोधात तक्रार केली होती, जो तिला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. उर्फीने त्या व्यक्तीसोबतच्या त्याच्या चॅटचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले होते ज्यामध्ये तो व्हिडिओ कॉलवर उर्फीसोबत सेक्स करण्याचा आग्रह करत होता.
View this post on Instagram
सोशल मीडिया पोस्टमध्ये मुंबई पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर आज उर्फी त्यांचे आभार मानताना दिसली. उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल स्टोरीवर ओबेदचा फोटो शेअर केला आणि पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे मुंबई पोलिसांचे उर्फीने आभार व्यक्त केले. उर्फीने लिहिले, ‘गुड न्यूज ! माझ्याशी गैरकृत्य करणारा हा माणूस अखेर तुरुंगात आहे. मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार. ओबेदच्या अटकेनंतर अभिनेत्रीने आता सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.





