उर्फी जावेदला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांत घेतली धाव….

मुंबई – आपल्या अतरंगी फॅशनमुळे अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत येत असते. रोज तिचा नवा आणि अजब-गजब फॅशन लूक लोकांना पाहायला मिळतो. दरम्यान, आता उर्फीला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वतः अभिनेत्रीने याबद्दल आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. उर्फी जावेद हिला यापूर्वी देखील अश्लील भाषेत शिवीगाळ करून बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा तिच्यासोबत असंच काहीसं घडलं असल्याचं दिसून येत आहे. यावेळी उर्फीला अज्ञात कॉलरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यामुळे आता उर्फी जावेदने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रविवारी उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीमध्ये या प्रकरणाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत.
उर्फीने तिच्या स्टोरीमध्ये लिहल आहे की… “माझ्या आयुष्याचा आणखी एक दिवस आणि मला आणखी एक दिवस धमक्या मिळाल्या आहेत. आजारपणातही मी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली आहे. त्याच्याकडे माझ्या गाडीचा नंबर आहे आणि ती व्यक्ती मला जीवे मारण्याची धमकी देत आहे….’ असं उर्फी म्हणली. दरम्यान, आता उर्फीने या प्रकरणाविषयी पोलिसात तक्रार केली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेतं ते पाहणं महत्वाचं आहे.






