Urfi Javed : उर्फी जावेद कडून मणिपूरच्या घटनेचा निषेध; नेटकरी म्हणाले….

मुंबई – ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, या हिंसाचारामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. येथे दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बॉलीवूड कलाकरांनी देखील या संपूर्ण घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, रेणूका शहाणे आणि रिचा चड्ढा यांनी ट्वीट करत मणिपूरमधील घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
अश्यातच, आता आपल्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद हिने देखील एका वेगळ्या प्रकारे या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. सध्या उर्फीची ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Urfi Javed takes a strong stand on Manipur Case. 🙏@uorfi_ #urfijaved #Manipur #ManipurCrisis #ManipurViolence pic.twitter.com/ayz4tHJmdN
— E24 (@E24bollynews) July 20, 2023
या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने केसांना लाल रंग दिल्याचे दिसत आहे. माणिपूरच्या घटनेचे एक फलक देखील उर्फी जावेद हिने हातामध्ये घेतल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत म्हटले की, “आम्ही तुझ्यासोबत आहोत…’ असं म्हंटलं आहे. दरम्यान, अनेक बाॅलिवूड स्टारने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. आरोपींनी कठोर शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आलीये.





