“ती आली तिनं बॉक्स काढला आणि…” उर्फी जावेदने दिलेलं आगळंवेगळं गिफ्ट पाहून मीडियाकर्मी देखील भारावले

मुंबई – अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या अतरंगी फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते. यामुळे अनेकदा उर्फी चर्चेत देखील येत असते. मात्र उर्फीने सध्या असा एक कारनामा करून दाखवला आहे ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अनेकांचं म्हणणं आहे उर्फीने केलेली ही गोष्टी बड्या बड्या अभिनेत्रींना देखील जमलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद हे नाव केवळ ट्रोलिंग किंवा पोलिटिकल काँट्रव्हर्सीमध्ये दिसून येत होत. अनेकांनी तर उर्फी मॉडेलिंग कमी आणि नौटंगी जास्त करत असल्याची टीका देखील सोशल मीडियावरून केली होती. मात्र आता उर्फीने जे करून दाखवलं आहे. त्यामुळे तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. याबाबद्दल अनेकांनी उर्फीचे कौतुक देखील केले आहे.
बॉलिवूड स्टार्सना फेमस करणारे पापाराजी सर्वांना माहिती असतील. अनेक स्टार्स केवळ या पापरिजींमुळे चर्चेत असतात. उर्फीने याच पापराजींना एक खास गिफ्ट दिले आहे ज्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. उर्फीने पापाराजीना प्रेमाची भेट देत ‘घड्याळ’ गिफ्ट म्हणून दिली आहेत. यामुळे अनेकजण उर्फीचे कौतुक करत आहेत. जे कधी मलायका आणि करिनाने नाही केले ते उर्फीने केलं असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
पापाराझींशी बोलताना ती सर्वांना स्मार्ट घड्याळ देताना दिसत आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी उर्फी नेहमीप्रमाणे आपल्या हटके स्टाईलमध्ये दिसून आली.
View this post on Instagram
खतरों के खिलाडीमध्ये उर्फी येणार ?
‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचं 13 वं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या पर्वासाठी या कार्यक्रमाची टीम स्पर्धकांच्या शोधात आहे. आणि यासाठी त्यांनी उर्फी जावेद हिची निवड केल्याचं सांगण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ‘खतरों के खिलाडी 13’ च्या टीमने उर्फी जावेदला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली आहे.





