उर्फी जावेद पडली एमसी स्टॅनच्या प्रेमात; सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली, “माझं त्याच्यावर खूप प्रेम…’

मुंबई – बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅनची लोकप्रियता दुप्पट झाली आहे. साडेचार महिने चाललेल्या या शोमधील एमसी स्टॅनची वेगळी शैली प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. हेच कारण होते की बिग बॉसमध्ये फारसे सक्रिय नसूनही चाहत्यांनी त्याची साथ सोडली नाही. आणि याच कारणामुळे एमसी स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
दरम्यान, घराबाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनचं सोशल मीडियावर अजुनही कौतूक होताना दिसतंय. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात तीव्र स्पर्धा होती. अनेकांनी शिव हाच विजेता होणार अशी सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र, सलमाननं एमसी स्टॅनचा हात उंचावत त्याच्या नावाची घोषणा केली आणि सगळीकडे एमसी स्टॅनच्या नावाचा जयघोष सुरु झाला. एमसी स्टॅनचा सोशल मीडियावर स्वतः असा वेगळा चाहता वर्ग असून, बॉलिवूड कलारांमध्ये देखील त्याची प्रचंड क्रेज आहे.
View this post on Instagram
अश्यातच, अभिनेत्री आणि मॉडेल ‘उर्फी जावेद’ने देखील एमसी स्टॅनचं विशेष कौतूक केल असल्याचं दिसून आलं आहे. उर्फीनं थेट आता एमसी स्टॅनविषयी प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. “मला तो खूप आवडतो आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे.’ अशा शब्दांत उर्फीनं एमसी स्टॅनवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
नुकतंच उर्फीला तूला एमसी स्टॅनसोबत काम करायला आवडेल का? असा प्रश्न विचारल्यानंतर उर्फीनं जे उत्तर दिलं ते तिच्या चाहत्यांना आवडलं आहे. यावेळी ती म्हणाली, “माझी तयारी आहे. पण आता एमसी स्टॅन हा आता मोठा माणूस झाला आहे. तो मनानं खूप चांगला आहे. मला तो खूप आवडतो.. त्याला खूप खूप शुभेच्छा..! ‘असं उर्फीनं म्हटले आहे.





