Pune | यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत रोहित धोंडगे या विद्यार्थ्याने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. सविस्तर निकाल यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने या परीक्षेतून नियुक्तीसाठी एकूण 206 उमेदवारांची शिफारस केली आहे. यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 92, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 18 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 26 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच 70 अन्य विद्या शाखेच्या उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांची संख्येत खुला वर्गातील विद्यार्थी सर्वाधिक 71 आहेत. त्यापाठोपाठ ओबीसी (59), अनुसूचित जाती (34), इब्ल्यूएस (22) आणि अनुसूचित जमाती (20) आहेत.
या परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकीच्या परीक्षेत रोहित धोंडगे याने अव्वल, तर हर्षित पांडे व लक्ष्मीकांत यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. डी. मदनकुमार चौथ्या आणि अमन प्रताप सिंग पाचव्या स्थानावर आहेत. यूपीएससीने जूनमध्ये अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी लेखी परीक्षा घेतली होती. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणी घेण्यात आली होती. आता आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला आहे.





