UPI Transactions : युपीआय व्यवहार होणार आता आणखी फास्ट; ‘या’ नियमात मोठा बदल

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. युपीआय ट्रांझक्शन आता पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सर्व्हीसला आणखी वेगवान आणि विश्वासार्ह करण्यासाठी रिस्पॉन्स टाईम निश्चित केला आहे. २६ एप्रिल रोजी जारी केलेल्या सर्क्युलरनुसार NPCI ने सर्व बँका आणि पेमेंट्स ॲपना याचे निर्देश दिले आहेत.
कधीपासून होणार बदल?
१६ जून २०२५ पासून नवीन प्रोसेसिंग मानके लागू होणार आहेत. UPI दर महिन्यास सुमारे २५ लाख कोटी रुपयांचे डिजिटल ट्रांझक्शन प्रोसेस करत आहे.त्यामुळे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नव्या नियमांमुळे युपीआयचे आर्थिक व्यवहार अधिक जलद आणि खात्रीशीर होण्यास मदत होणार आहे.
व्यवहार पूर्ण होण्यास किती वेळ लागणार?
नवीन नियमांनुसार युपीआयने संबंधित अनेक सर्व्हीससाठी आता प्रतिसादाचा वेळ पूर्वीपेक्षा कमी केला आहे. आता रिक्वेस्ट पे आणि रिस्पॉन्स पे सर्व्हीस नवीन नियमानुसार रिस्पॉन्स टाईम ३० सेकंदाऐवजी करुन १५ सेकंदाचा केला आहे. चेक ट्राझक्शन स्टेटस आणि ट्राक्झशन रिव्हर्ससाठी १० सेंकद आणि वॅलिडीटी एड्रेससाठी १० सेकंद केला आहे.
सर्व्हीस प्रोवायडरना दिला सल्ला
एनपीसीआयने सर्व युपीआय नेटवर्कशी जोडलेल्या बँका आणि पेमेंट सर्व्हीस प्रोवायडरना ( उदा. GPay, PhonePe, Paytm आदी) सल्ला दिला आहे की प्रतिसादाची वेळ कमी केल्याने कोणताही तांत्रिक समस्या उद्भवू नयेत याची काळजी घ्यावी.
का घेण्यात आला निर्णय?
काही दिवसांपूर्वी १२ एप्रिल रोजी मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी अनेक ट्राक्झशन फेल झाले होते. मार्च आणि एप्रिलमध्ये तीन वेळा २६ मार्च, १ एप्रिल, १२ एप्रिल रोजी यंत्रणेत मोठा बिघाडाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे डिजिटल पेमेंट करताना ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले.





