रणवीरच्या ‘डॉन ३’ चित्रपटाची अपडेट समोर; टीव्ही क्षेत्रातील अभिनेत्याची होणार एन्ट्री?

Don 3 film | बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह त्याच्या ‘डॉन ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच ‘डॉन 3’चे शूटिंग सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान आता या चित्रपटाची एक अपडेट समोर आली आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीला चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी निवडले गेले होते, मात्र काही कारणामुळे तो या प्रोजेक्टमधून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी निर्मात्यांनी टीव्हीवरील एका प्रसिद्ध अभिनेत्याला कास्ट करण्याचा विचार केला आहे.
समोर आलेलया माहितीनुसार, विक्रांतच्या जागी ‘डॉन 3’च्या मेकर्सने खलनायकाच्या भूमिकेसाठी ‘बिग बॉस 18’चा विजेता करणवीर मेहराला ऑफर दिली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आला नाही आहे. Don 3 film |
View this post on Instagram
‘डॉन 3’मध्ये रणवीर सिंहसोबत कियारा अडवाणी झळकणार होती. मात्र गरोदरपणामुळे तिने या चित्रपटातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. आता तिच्या जागी कृती सेननची अंतिम निवड करण्यात आली आहे. नुकतेच कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान, कियारा नंतर आता विक्रांतने देखील अचानक हा प्रोजेक्ट सोडला आहे.
करणवीर मेहरा वर्कफ्रंट
करणवीर मेहराला ‘बिग बॉस 18’ मुळे खूप लोकप्रियता मिळाली. त्याने अनेक मालिकांमध्ये आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. ‘बिग बॉस 18’जिंकल्यानंतर करणवीर मेहरा ‘खतरो के खिलाडी 14’ चा देखील विजेता ठरला. यांनतर आता तो हर्षवर्धन राणे आणि सादिया खातिब यांच्यासोबत ‘सिला’ या चित्रपटात दिसणार आहे. Don 3 film |
हेही वाचा :
शिरूरमध्ये निवडणुकीचा रंग ! गट – गन जाहीर होताच मतदारांना साद; आखाडात स्नेहभोजन की निवडणूक प्रचार?





