या आठवड्यात येणार 5 नव्या कंपन्यांचे IPO, ग्रे मार्केटमध्येही दमदार प्रतिसाद

Upcoming IPO: एकीकडे शेअर बाजारात घसरण सुरू असताना, दुसरीकडे आयपीओची रांग लागली आहे. या आठवड्यात 5 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुले होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने एसएमएई सेगमेंटमधील आयपीओचा समावेश आहे. हे आयपीओ कोणते आहेत, त्याविषयी जाणून जाणून घेऊयात.
कॅपिटल नंबर्स इन्फोटेक लिमिटेड
कंपनी आयपीओच्या माध्यमातून 169.37 कोटी रुपये उभारणार आहे. याद्वारे कंपनी 32.20 लाख नवीन शेअर जारी करेल. तर 32.20 लाख शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जाईल. हा आयपीओ 20 ते 22 तारखेपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. आयपीओची प्राइस बँड 250 रुपये ते 263 रुपये आहे.
CLN Energy
CLN Energy चा आयपीओ 23 ते 27 जानेवारीपर्यंत गंतवणूकदारांसाठी खुला असेल. आयपीओची प्राइस बँड 235 -250 रुपये असून, लॉट साइज 600 शेअर्स आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठी गुंतवणूक करावी लागेल.
जीबी लॉजिस्टिक (GB Logistics IPO)
जीबी लॉजिस्टिकचा आयपीओ 24 जानेवारीला उघडेल. 28 जानेवारीपर्यंत या आयपीओवर बोली लावता येईल. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 24.58 लाख शेअर जारी करणार असून, याच्या प्राइस बँडची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
Rexpro Enterprises
रेक्सप्रो इंटरप्राइजेसचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी 22 ते 24 जानेवारीपर्यंत खुला असेल. या आयपीओची प्राइस बँड 145 रुपये आहे. तर लॉट साइज 1000 शेअर्स आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमीत कमी 1,45,000 रुपये गुंतवावे लागतील.
डेन्टा वॉटर
डेन्टा वॉटर या आयपीओचे प्राइस बँड 279 ते 290 रुपये प्रति शेअर्स आहे. याची लॉट साइज 50 शेअर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमीत कमी 14,700 रुपये गुंतवावे लागतील. हा आयपीओ 22 ते 24 जानेवारीपर्यंत खुला असेल.
ग्रे मार्केटमध्ये देखील या आयपीओंना पसंती मिळत आहे. मात्र, यात गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





