Upcoming IPO : शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणुकीची संधी, या आठवड्यात उघडणार ‘हे’ 5 IPO

Upcoming IPO | घसरणीनंतर भारतीय शेअर बाजार पुन्हा सावरताना दिसत आहे. अनेक कंपन्यांचे आयपीओ देखील गुंतवणूकदारांसाठी खुले होत आहेत. तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या आठवड्यात बाजारात अनेक नवीन आयपीओ येणार आहेत. या आठवड्यात बाजारात कोणते आयपीओ येणार आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात.
डेस्को इन्फ्राटेक (Desco Infratech)
Desco Infratech चा आयपीओ 24 मार्च रोजी उघडेल. तर गुंतवणूकदार 26 मार्चपर्यंत बोली लावू शकतात. याचे प्राइस बँड 147 ते 150 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 20 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.
ग्रँड कॉन्टिनेंट हॉटेल्स (Grand Continent Hotels)
ग्रँड कॉन्टिनेंट हॉटेल्सच्या आयपीओची साइज 74.46 कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओद्वारे 62.60 शेअर्स आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत 3.29 लाख शेअर्स जारी करेल. कंपनीचा आयपीओ 20 मार्च रोजी गुंतवणूकदारांसाठी उघडला आहे. गुंतवणूकदार 24 मार्चपर्यंत बोली लावू शकतात. आयपीओचे प्राइस बँड 107 ते 113 रुपये प्रति शेअर आहे.
अॅक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर्स (Active Infrastructures)
अॅक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर्सचा आयपीओ 21 मार्च रोजी उघडला. यासाठी गुंतवणूकदार 25 मार्चपर्यंत बोली लावू शकतात. कंपनीने आयपीओसाठी प्राइस बँड 178 ते 181 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. आयपीओला पहिल्या दिवशी 0.20 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे.
श्री अहिंसा नॅचरल्स लिमिटेड (Shri Ahimsa Naturals Limited)
कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांना बोली लावण्यासाठी 25 मार्च ते 27 मार्च दरम्यान खुला राहील. कंपनीने आयपीओसाठी 113 रुपये ते 119 रुपये प्राइस बँड निश्चित केले आहे. कंपनी या माध्यमातून 73.81 कोटी रुपये उभारणार आहे.
रॅपिड फ्लिट (Rapid Fleet)
कंपनीने आयपीओसाठी 183 रुपये ते 192 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. आयपीओची लॉट साइज 600 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. 21 मार्च रोजी हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. गुंतवणूकदार 25 मार्चपर्यंत आयपीओसाठी बोली लावू शकतात
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





