UP Election : भाजपची गळती थांबेना ! 24 तासांच्या आतच आणखी एका मंत्र्याचा राजीनामा

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपला २४ तासांच्या आत दुसरा धक्का बसला आहे. कॅबिनेटमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर योगी सरकारमधील आणखी एक मंत्री आणि ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे. मागील २४ तासांत भाजपमधील आतापर्यंत ६ नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
दारा सिंह चौहान समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. केवळ दोन दिवसांत दोन मंत्री आणि चार आमदारांनी पक्ष सोडल्याने निवडणूक भाजपसाठी खडतर होत चालली आहे.
यापूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला होता. मौर्य उत्तर प्रदेशात ओबीसीचा चेहरा मानले जात होते. त्याच्यासोबत चार आमदारांनी भाजपची साथ सोडली. यामध्ये बृजेश प्रजापति, रोशन लाल, भगवती सागर, आणि विनय शाक्य यांचा समावेश आहे.
ओबीसी मतं आपल्याकडे वळविण्यासाठी स्वामी प्रसाद मौर्य हे भाजपच्या योजनेचे केंद्रबिंदू होते. मात्र त्यांनीच समाजवादी पक्षात प्रेवश केला आहे. एकंदरीतच भाजपमध्ये सुरू झालेली गळती थांबण्याच नाव घेत नसल्याचं चित्र सध्या उत्तर प्रदेशात आहे.





