#UP Election 2022: बेरोजगारांना समाजवादी पक्ष रोजगार देईल – मुलायमसिंग
Updated On:

नवी दिल्ली – पाच राज्यातील निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. उत्तर प्रदेश मधील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांनी आज जनतेला दिले.
उत्तर प्रदेश मधील मैनपुरी आणि करहल मधील सभेमध्ये ते बोलत होते. अखिलेश यादव यांच्या प्रचार करण्यासाठी प्रथमच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले हे विशेष. समाजवादी पक्षाचा जोरदार प्रचार आज त्यांनी केला.
तसेच केंद्र सरकारच्या धोरणावर पण जोरदार टीका केली. तसेच समाजवादी पक्षाचे सरकार उत्तर प्रदेशमध्ये आले तर प्रत्येक हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अखिलेश यादव यांच्यासाठी मत मागताना मतदारांना भावनिक साद घालायलाही विसरले नाही.





