कराड बसस्थानकासमोर आढळली बेवारस बॅग; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

कराड- येथील बसस्थानकासमोर असलेल्या तृप्ती हॉटेलसमोर शुक्रवारी सायंकाळी एक बेवारस बॅग पडल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ बॅगची तपासणी करण्यासाठी सातारा बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करताच ते रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. संबधित बॅगची तपासणी केल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने ती बॅग ताब्यात घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बस स्थानकासमोरील तृप्ती लॉज, एसएस मोबाईल व वेलनेस मेडिकल या दुकानांच्या समोर एक बेवारस प्रवाशी बॅग दिसून आली होती. पोलिसांना रात्री याची समजली. त्यांनी तात्काळ बाॅम्ब शोधक पथकाला पाचारण केले.
काही वेळातच बाॅम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबधित बॅगची तपासणी केल्यानंतर ती बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगेत काय होते, ती कुणी ठेवली आहे,.हे अजून समजलेले नाही.
सबंधित बॅगेची पोलिसानी व बाॅम्ब शोधक पथकाने इदगाह मैदानावर नेऊन तपासणी केली असता, त्यामध्ये काही पिशव्या व साहित्य आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मात्र, पोलिसांनी याबाबत काहीही माहिती दिली नाही.





