Jasmine Sandlas : “जोपर्यंत महिलांना सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत…”; ‘धुरंधर’ फेम गायिका भर कॉन्सर्टमध्ये संतापली

Jasmine Sandlas : म्युझिक कॉन्सर्टमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. यातच आता पंजाबी गायिका जास्मिन सँडलासच्या कॉन्सर्टमध्ये देखील असा प्रकार घडला आहे. ज्यावेळी तिला तेथे आलेल्या काही महिलांसोबत दोन पुरुष गैरवर्तन करत असल्याचे दिसले.
त्यावेळी गायिकेने कॉन्सर्ट मधेच थांबवले आणि तातडीने सुरक्षा रक्षकाला बोलावले आणि त्यांना बाहेर काढले. तिच्या ह्या कृतीचे आता सोशल मिडियावर प्रचंड कौतुक केले जात आहे.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये जास्मिनचा कॉन्सर्ट शो आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टमध्ये तिची थेट पालखीमधून एन्ट्री झाली होती. त्यादरम्यान जास्मिन डिस्कोग्राफी बघत असताना दोन पुरुष आजूबाजूच्या महिलांशी गैरवर्तन करत असल्याचे तिला दिसले. Jasmine Sandlas
त्यावर ती सुरक्षा रक्षकाला बोलावत म्हणाली, “सिक्युरिटी, तुम्ही या मुलांना बाहेर काढू शकता का? ते महिलांना त्रास देत आहेत. जोपर्यंत महिलांना सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत मी गाणार नाही.” तिच्या या वक्तव्यानंतर जमलेल्या चाहत्यांनी टाळ्या वाजवत तिच्या निर्णयाचे कौतुक केले. Jasmine Sandlas
View this post on Instagram
जास्मिनला नुकतीच ‘धुरंधर’ चित्रपटातील शरारत या गाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. हे गाणे खूपच मोठ्या प्रमाणात गाजले आहे.
दरम्यान, भारतात अनेक लोकप्रिय गायकांच्या ‘कॉन्सर्ट’ला चाहत्यांची प्रचंड गर्दी होत असल्याचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेकदा अशा गर्दीमध्ये गैरप्रकारही घडताना दिसतात. यातच आता हा आणखी एक प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा:

