Maharashtra Weather Update : राज्यातील या भागात अवकाळी पावसाचा इशारा; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामान

Unseasonal rain warning in the state for the next five days | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान राजगुरूनगर येथे नोंदविण्यात आले होते. येथील तापमानाचा पारा 41अंश सेल्सिअसवर गेला होता. तर पुणे शहरातील कोरगाव भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. हवेतील थंडावा गायब होण्यास सुरूवात झाली असून उकाडा प्रचंड वाढला आहे. यामुळे जिवाची काहिली होऊ लागली आहे. अशातच पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भात काही ठिकाणी विजांसह गडगडाटी वादळे पाऊस पडले, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यानुसार राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रपूरचे तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या आसपास गेले होते. तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, कोकण, सांगली, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुर्य आग ओकत होता. मुंबई, पुणे, नागपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड, जळगाव, अकोला, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिकमध्ये आज तापमान सामन्य राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे.
पुढील ५ दिवस, विदर्भात काही ठिकाणी विजांसह गडगडाटी वादळे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD…… भेट घ्या. pic.twitter.com/bhlKMP384S— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 19, 2025
वीज कोसळण्याचीही शक्यता
होळीनंतर तापमानात सातत्याने वाढ होत गेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर उष्णतेची झळ अधिक तीव्र झाली आहे. यातच तापमानातही चढ उतार होऊ शकतात असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच या ठिकाणी वीज कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





