पुणे जिल्हा | काझड-शिंदेवाडीत अवकाळीने केळी भुईसपाट

भवानीनगर, (वार्ताहर) – अवकाळी पावसामुळे व वार्याच्या वेगाने काझड- शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकर्यांचे केळीच्या पिकाचे नुकसान होऊन अंदाजे तीन एकरामध्ये मिळून 15 ते 20 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकर्यांनी दिली.
काझड – शिंदेवाडी येथे अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे श्रीमती पार्वती मारुती गायकवाड यांचे क्षेत्र 3 एकर (गट नंबर 121 व 123) या क्षेत्रातील केळीच्या पिकांचे अत्यंत नुकसान झालेले आहे.
सदर पाहणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे व त्यावेळेस नुकसानग्रस्त कुटुंबाला भेट देऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून त्यांची विचारपूस केली असता सदर केळीसाठी अंदाजे 6 ते 7 लाख रुपये खर्च केलेला आहे असे त्यांनी सांगितले संपूर्ण क्षेत्रातील केळीची वेन चालू असताना वादळ वार्यामुळे संपूर्ण केळीचे पीक उध्वस्त झाले आहे.
सदर केळ उत्पादनासाठी पतसंस्था, बँक, हात उसने इत्यादी कडून भांडवल उभा केले होते. या केळीपासून अंदाजे उत्पादन 15 तेे 20 लाख अपेक्षित होते कारण संपूर्ण केळी निर्यातक्षम होती. आता झालेले नुकसान पाहता येणारे उत्पादन लांबच राहिले परंतु झालेली कर्ज कसे फेडायचे या भीतीने संपूर्ण कुटुंब हादरुन गेलेले आहे. व त्यांची मानसिकता खालावलेली आहे.
अमरसिंह कदम यांनी प्रत्यक्ष प्रशासनाशी संपर्क साधून केळीचे झालेले नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी संपर्क साधूनकेळीचे झालेले नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी संपर्क साधला व कुटुंबाला धीर दिला. यावेळेस स्थळ पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम तालुका पक्ष अध्यक्ष बाबासाहेब झगडे,
तालुका संपर्कप्रमुख राजकुमार शिंदे, सोशल मीडिया प्रमुख राहुल घोळवे, जिल्हा खजिनदार नितीन घोळवे, कृष्णा कदम, औदुंबर आव्हाड, विनायक कदम, सिद्धेश्वर शिंदे, मधुकर येलजाळे, प्रकाश कुंभार, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
आत्ताच लोकसभेचे मतदान झाले लोकसभेच्या मतदानासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते दारोदारी फिरत होते; परंतु मतदान झाल्यानंतर तिसर्याच दिवशी माझ्या शेतकरी मायबापावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वपक्षीय गाव पुढारी व नेत्यांना दिसले नाही हीच या देशाची शोकांतिका आहे. -अमरसिंह कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष





