पुणे जिल्हा | भवानीनगर, सणसरमध्ये तोफांची सलामी

भवानीनगर, (वार्ताहर) – सुप्रिया सुळे यांचा मोठा मताधिक्याने विजयी झाल्याने बारामती तालुक्यातील काटेवाडी, कण्हेरी, इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर या परिसरामध्ये गुलाल उधळून व तोफांची सलामी देऊन हा विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.
शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी तसेच आमदार रोहित पवार, बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, सुनंदा पवार तसेच कुटुंबातील इतरही सदस्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केल्याने तसेच सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिकांनी खर्या अर्थाने ही निवडणूक हातामध्ये घेतल्याने सुळे यांचा विजय केवळ सर्व कार्यकर्त्यांचा व जनतेचा असल्याचे मत शरयू फाउंडेशनचे अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केले.
जल्लोषा प्रसंगी शर्मिला पवार यांच्या समवेत महादेव कचरे, शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सतीश काटे, अॅड. रोहित काटे, छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक तात्यासाहेब देवकाते, सुजित नरूटे, रवींद्र घुले, प्रकाश गरदडे, रामभाऊ ठोंबरे, राजेंद्र कढणे, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





