“बिग बी’मध्ये अद्भूतपूर्व उत्साह – नलनीश नील

“गुलाबो सिताबो’चा अभिनेता नलिनीश नीलने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून बरेच काही शिकल्याचे सांगितले आहे. नलनीश म्हणाला, अमिताभ सरांसोबत काम करणे माझ्यासाठी भाग्याचा क्षण होता. सेटवरील त्यांची उर्जा आश्चर्यकारक असते. यापूर्वी आम्ही एका जाहिरातीत एकत्री काम केले होते आणि आता या चित्रपटात काम केले आहे.”
“आम्ही एका वाचन सत्रासाठी मुंबईच्या त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो आणि हा तो एक अनुभव अद्भूत होता. मला त्यांच्याकडून आणि काम करण्याच्या समर्पणातून बरेच काही शिकायला मिळाले. तो त्याच्या सहकलाकारांना सहज समजावून सांगतात. मला स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांची खूप मदत झाली.
शुजीत सिरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नलनीश नीलने फातिमा महल यांची काळजी घेणा-याची भूमिका साकारली आहे. यात तो मुकबधिराची भूमिका साकारत असल्याने त्याचा एकही संवाद नाही. “गुलाबो सीताबो’मध्ये आयुष्मान खुराना, विजय राज, बृजेन्द्र काला, सृष्टी श्रीवास्तव आणि फारुख जफर यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याचा प्रीमियर नुकताच अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला आहे.





