वॉशिंग्टन, दि. 3 -अमेरिकेकडून रशियावर नव्याने निर्बंध गातले गेले आहेत. या नव्या निर्बंधांनुसार अमेरिकेने रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या कथित गर्लफ्रेंड एलिना माराटोव्हा काबाएवा हिला काळ्या यादीत टाकले आहे.39 वर्षीय काबा एवा ही पुतीन यांची अत्यंत जवळची मैत्रीण मानली जाते. ती रशियाच्या संसदेतील माजी सदस्या आहे. सध्या रशियातील राष्ट्रीय माध्यम समूहाची सदस्या आहे. देशातील सरकारी टीव्ही आणि वर्तमानपत्राचे समन्वय ही संस्था करत असते.
रशियाच्या सरकारी माध्यम समूहाची पदाधिकारी असल्याच्या कारणामुळे तिच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. काबाएवावर निर्बंध घालण्याचा विचार अमेरिकेकडून यापूर्वीपासूनच केला जात होता. मात्र तिचे पुतीन यांच्याबरोबरचे घनिष्ट संबंध बघता या निर्बंधांमुळे पुतीन यांना प्रचंड राग येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई टाळली गेली होती.
काबाएवावर यापूर्वी मे महिन्यातच युरोपीय संघ आणि ब्रिटननेही निर्बंध घातले आहेत. काबाएवावर निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी भ्र6टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले रशियातील प्रमुख विरोधी नेते आणि पुतीन यांचे कट्टर विरोधक ऍक्सी नवालनी हे बऱ्याच काळापासून करत होते. युक्रेनच्याविरोधात कारस्थान करत असल्याचा आरोप ते काबाएवावर करत होते.