जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत युनिक शूटिंग स्पोर्ट क्लबच्या नेमबाजांना ९ पदके

शिरूर – युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब व विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने २० व २१ सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा ग्रामीण शालेय नेमबाजी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये शिरूरच्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या नेमबाजांनी ९ पदकांची कमाई केली.
या स्पर्धा १४, १७ व १९ वयोगटातील मुले व मुलींमध्ये पार पडल्या. यामध्ये पिप साईट एअर रायफल १४ वर्ष वयोगटात ओवी निलेश पवार पोद्दार इंटरनॅशनल स्कूल हिने ४०० पैकी ३९५ गुण मिळवून सुवर्णपदक मिळवले. तर समृद्धी अजय चव्हाण विद्याधाम प्रशाला शिरूर ३६८ गुण मिळवून रौप्यपदक मिळवले. ऋग्वेदा गंगाधर शिंदे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ३५५ गुण मिळवून कांस्यपदक पटकावले.
याशिवाय १७ वर्ष वयोगटात श्रावणी संतोष वाळके,कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, कारेगाव-३९० गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले. समीक्षा पोपट ढेरंगे ,होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूल, भीमा कोरेगाव ३७० गुण मिळवून रौप्यपदक पटकावले.
१९ वर्ष वयोगटात वेदांत संजय भाकरे , विजयामाला इंग्लिश मीडियम स्कूल – ३८४ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले. हर्षराज गणेश वाळके , विजयामाला इंग्लिश मीडियम स्कूल – ३८२ गुण मिळवून रौप्यपदक पटकावले.
ओपन साईट एअर रायफल
– १४ वर्ष वयोगटात मोहम्मदअली सुहेल अहमद सय्यद ,सेंट जोसेफ स्कुल शिरूर – २०३ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले.
– १७ वर्ष वयोगटात रुद्र तानाजी वाळके , विद्याधाम प्रशाला, शिरूर २२१ गुण मिळवून रौप्यपदक गुणांची कमाई करत एकुण ०९ पदकांची लयलूट केली आहे..या विदयाथ्र्याची आगामी होणाऱ्या पुणे विभागीय शालेय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, शिरूर मधील श्री. छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे, उपाध्यक्ष धनंजय थिटे, आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





