नवीन वर्षाच्या राम गोपाल वर्मा यांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा; ट्विट चर्चेत

मुंबई – चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी शनिवारी म्हणजेच 31 डिसेंबर 2022 च्या शेवटच्या दिवशी एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. त्याने चाहत्यांना ‘हॅपी न्यू इयर’ ऐवजी ‘हॅपी सेम इयर’ म्हटले आहे. मात्र, त्यामागे त्याने आपल्याच शैलीत एक मजेशीर कारण सांगितले आहे.
राम गोपाल वर्मा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘ज्या समस्या 31 डिसेंबर 2022 पर्यंत होत्या, त्या 1 जानेवारी 2023 ला तुम्ही उठल्यानंतरही कायम राहतील कारण तुम्ही अजूनही त्याच जुन्या पत्नी किंवा वृद्ध पतीसोबत असाल’. असं राम गोपाल वर्मा ट्विट मध्ये म्हणाला आहे. त्याच्या यव अनोख्या पोस्टवर अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, राम गोपाल वर्मा हे प्रसिद्ध पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता असून, त्यांनी हिंदीसोबतच तेलुगू आणि कन्नड चित्रपट केले आहेत. ‘कंपनी’, ‘सरकार’, ‘सरकार राज’ सारखे चित्रपट केले आहेत. तो गँगस्टर-ड्रामा चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. राम गोपाल वर्मा यांना ‘सत्या’, ‘जंगल’, ‘कंपनी’ आणि ‘भूत’ यांसारख्या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे,
मात्र काही काळापासून ते फक्त दक्षिणेतील चित्रपटांपुरतेच मर्यादित राहिले आहेत. तसेच, ते सोशल मीडियावर देखील आपले मत एकदम स्पष्ट पणे मांडत असतात. मात्र, त्यामुळे त्यांना ट्रोल देखील केलं जात असत.





