पुणे शहरात धावली अनोखी चारचाकी रिक्षा
Updated On:

पुणे – रस्त्यांवर धावणारी अनोखी चारचाकी रिक्षा शहरामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आणि चर्चेचा विषय झाली आहे. शुक्रवारी शहरामध्ये धावताना दिसलेली चारचाकी रिक्षा सर्व पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती.
“क्वाड्री सायकल’ असे या रिक्षाचे नाव आहे. यामुळे इंधनाची बचत होणार असून प्रदूषण देखील कमी होण्याची शक्यता आहे. शहरामध्ये सुमारे 5 “क्वाड्री सायकल’ला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.





