नवी दिल्ली – आजपासून महाराष्ट्रातील करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मास्क आणि निर्बंधांची सक्ती यापुढे नसणार आहे. असा निर्णय काल राज्य मंत्री मंडळाने घेतला आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांनी विरोध केला आहे. करोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे मास्कचा वापर करावा लागेल असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा.भारती पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने अद्याप मास्क बंदी केली नसल्याचे पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने मोठी घट पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये तर एकही करोना रुग्ण आढळत नाही. त्यातच सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व करोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयास केंद्राकडून विरोध करण्यात आला आहे.