केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून लतादीदींच्या निधनावर शोक; म्हणाले,”सर्व संगीत साधकांसाठी दीदी नेहमीच प्रेरणादायी”

मुंबई: आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या 93 वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला.
देश की शान और संगीत जगत की शिरमोर स्वर कोकिला भारत रत्न लता मंगेशकर जी का निधन बहुत ही दुखद है। पुण्यात्मा को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। उनका जाना देश के लिए अपूरणीय क्षति है। वे सभी संगीत साधकों के लिए सदैव प्रेरणा थी।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 6, 2022
दरम्यान, लतादीदींच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शोक व्यक्त केले आहे. नितीन गडकरींनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “देशाची शान आणि संगीत जगतातील शिरमोर स्वर कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर जी यांचे निधन अत्यंत दु:खद आहे. त्या पवित्र आत्म्यास माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे जाणे हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. सर्व संगीत साधकांसाठी त्या नेहमीच प्रेरणादायी होत्या”. असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.





