Jyotiraditya Scindia : “…तर मतदान करणार नाही,” तरुणाने इशारा देताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतापले
Jyotiraditya Scindia : मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल

Jyotiraditya Scindia : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशमधील दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या रोषाला सामोरी जावे लागले. ज्योतिरादित्य शिंदे हे शुक्रवारी गुना येथील गुलाबगंज भागातून जात असताना स्थानिक नागरिक आणि तरुणांनी त्यांचा ताफा अडवला. खराब झालेल्या रस्त्याची तक्रार करत असताना लोकांनी लवकरात लवकर रस्ता तयार करण्याची मागणी केली आणि निवेदन दिले.
यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी एका तरुणाने रस्ता वेळेवर पूर्ण न झाल्यास मतदान करणार नाही, असा इशारा दिला. यावर ज्योतिरादित्य शिंदे देखील, “माझ्याशी अशा भाषेत बोलू नका,” असे म्हणत संतापल्याचे पाहायला मिळाले. (Jyotiraditya Scindia)
सत्ता का अहंकार देख लीजिए। जनता ने सड़क क्या मांग ली, ‘राजा जी’ भड़क गए।
कहने लगे – मेरे सामने ऐसी भाषा का प्रयोग ना करना, मुझसे निवेदन करो।
जनता इनके अहंकार को जल्द ठिकाने लगाएगी। pic.twitter.com/GVPIjvXJM8
— Congress (@INCIndia) September 18, 2026
नेमकं काय प्रकरण आहे? (Jyotiraditya Scindia)
बरखेडा गिर्दमध्ये आयोजित मुख्यमंत्र्यांच्या जनविश्वास शिबिरात भाग घेतला, जिथे त्यांनी ‘नमो ड्रोन दीदी किरण’च्या मदतीने ड्रोन उडवले. या कार्यक्रमादरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. जो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मतदारसंघातील काही लोक आपली तक्रार घेऊन त्यांच्याकडे आले होते. कार्यक्रमानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. दरम्यान, ते आपल्या गाडीत बसून लोकांच्या तक्रारी ऐकत होते.
मतदारसंघातील काही तरुण ज्योतिरादित्य शिंदे यांना म्हणाले की, “या रस्त्यामुळे गावांतील नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. माझी विनंती आहे की, यावेळी हा रस्ता वेळेपूर्वीच तयार करावा. जर रस्ता केला नाही, तर आमच्यापैकी कोणीही मतदान करणार नाही.” यावर शिंदे संतापल्याचे दिसून आले. ” माझ्याशी बोलताना कधीही अशा भाषेचा वापर करू नका. तुमचे काम निवेदन देण्याचे आहे आणि माझे काम सेवा करण्याचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “तुम्ही येऊन विनंती करता, तर काम करणे ही माझी जबाबदारी आहे. समस्या मांडताना भाषेचे भान आणि मर्यादा राखली पाहिजे.” मंत्र्यांचा संतप्त सूर आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांकडून शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. यानंतर शिंदे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्याचा तांत्रिक आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. पावसाळा संपताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. Jyotiraditya Scindia
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या कृतीवरून कॉँग्रेसने देखील टीका करत, ‘सत्तेचा अहंकार पाहा… जनता रस्ता मागत आहे आणि ‘राजाजी’ संतापले. लोक या अहंकाराला योग्य रस्ता दाखवतील,’ असे म्हंटले आहे.
हेही वाचा:





