Hardeep Singh Puri : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे बिलावल भुट्टो झरदारी यांना प्रत्युत्तर; म्हणाले…

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे आणि याचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागेल. आताशी केवळ सुरूवात झाली आहे, पाकिस्तानला याची मोठी किंमत मोजावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे.
हरदीप सिंग पुरी म्हणाले की, पहलगामची घटना ही स्पष्टपणे शेजारील देशाने केलेला सीमापलिकडून केलेला दहशतवादी हल्ला आहे आणि ते त्याची जबाबदारी घेत आहेत. आता कोणताही व्यापार पूर्वीसारखा सुरू राहणार नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही फक्त सुरुवात आहे. दहशतवादी जगण्याचा सर्वात मूलभूत अधिकार हिरावून घेतात. संपूर्ण जग याचा निषेध करत आहे.
पाकिस्तान हा केवळ एक वाईट देश नाही तर तो एक अधोगतीशील देश आहे. पुरी यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या बिलावल भुट्टो यांच्या विधानावरही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की की मी त्यांना असे म्हणताना पाहिले की जर पाणी वाहिले नाही तर रक्त वाहील. त्यांनी अगोदर रक्त सांडावे आणि त्यात उडी मारावी. जर त्याला पाणी मिळाले नाही तर तो कुठे उडी मारेल? ते सोडा, तो मूर्ख माणूस आहे.




