‘Poor Lady’ म्हणत सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा उल्लेख ; भाजप आक्रमक, म्हणाले,”सर्वोच्च पदावर बसलेल्या..”

Union Budget 2025 । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. तर 1 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडतील. त्यापूर्वी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यानंतर संसदेत राष्ट्रपतींनी अभिभाषण केले. मात्र त्यांच्या अभिभाषणावर विरोधकांकडून प्रतिक्रिया समोर आल्या. यावरून आता नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी म्हणाल्या, “त्या एक ‘Poor Lady’ आहेत आणि भाषणानंतर त्या थकल्या होत्या.” असे त्यांनी म्हटले. त्यासोबतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे भाषण कंटाळवाणे असल्याचे म्हटले. आता यावरून राजकारण तापले आहे. भाजपने म्हटले आहे की सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केला आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विधानांवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सोनिया गांधी यांचे विधान सर्वोच्च पदावर बसलेल्या आदिवासी महिलेचा अपमान आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा होता. मागील अर्थसंकल्प आणि सरकारच्या कृती योजनांचा फायदा झाला आहे.” समाजातील प्रत्येक घटकाला याचा फायदा झाला आहे. हा एक असा लेखाजोखा होता जो केवळ नेत्रदीपक होता.”
#WATCH | Delhi | After the President’s address to the Parliament, Congress MP Sonia Gandhi says,”…The President was getting very tired by the end…She could hardly speak, poor thing…” pic.twitter.com/o6cwoeYFdE
— ANI (@ANI) January 31, 2025
सोनिया गांधींनी माफी मागावी – भाजप Union Budget 2025 ।
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विधानावर भाजप खासदार संबित पात्रा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सोनिया गांधी यांनी भाषणाबाबत केलेले विधान बरोबर नाही. राष्ट्रपतींनी त्यांचे विचार धाडसीपणे मांडले आहेत. सोनिया गांधींनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी.” राहुल गांधींवर टीका करताना भाजप खासदार म्हणाले की, ते पुन्हा पुन्हा स्वतःला लाँच करू शकत नाहीत.
अर्थमंत्र्यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले Union Budget 2025 ।
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण सादर केला. यानंतर, लोकसभेचे कामकाज १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आणि सांगितले की एक राष्ट्र, एक निवडणूक आणि वक्फ (दुरुस्ती) विधेयक यासारखे कायदे जलद गतीने मंजूर झाले आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी असेही म्हटले की, सरकार अभूतपूर्व कामगिरीद्वारे भारताच्या विकास प्रवासाच्या या अमृत काळाला नवीन ऊर्जा देत आहे. ते म्हणाले की, सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत.





