UnionBudget2022: दोन लाख अंगणवाड्यांचे अपग्रेडेशन होणार
Updated On:

नवी दिल्ली – देशातील दोन लाख अंगणवाड्यांचे अपग्रडेशन करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यात बालकांच्या विकासासाठी ऑडिओ-व्हिजुअल सुविधांसारख्या सुविधा असणार आहेत. त्यात क्लीन एनर्जींचेही प्रकल्प राबवले जातील तसेच मुलांसाठी चांगले शैक्षणिक वातावरण तयार केले जाणार आहे.
सरकारने नारी शक्तीच्या विकासाला मोठे प्राधान्य देण्याचे उद्दीष्ठ ठरवले असून महिला व बालकांच्या विकासासाठी हा अमृतकाल असेल असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी मिशन शक्ती, मिशन वात्स्यालय, सक्षम अंगणवाडी आणि पोषण या प्रकल्पांचा पुढचा टप्पा सुरू केला जात आहे, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.




