Shirur News : जांबूत येथे विहिरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन
Shirur News : शिरूर तालुक्यातील जांबूत गावाच्या हद्दीतील एका विहिरीत सुमारे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Shirur News : शिरूर तालुक्यातील जांबूत गावाच्या हद्दीतील एका विहिरीत सुमारे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत प्रमाणे नोंद करण्यात आली असून, मृताची ओळख पटविण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे. (Shirur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून त्याने अंगात काळ्या रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट आणि कमरेला राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेली आहे. ट्रॅक पॅन्टच्या उजव्या खिशावर “Shiv-Naresh” असे इंग्रजीत लिहिलेले आहे. (Shirur News)
सध्या मृताची ओळख पटलेली नसून, अशा वर्णनाची व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी तात्काळ शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Shirur News)
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद खटींग करीत असून, मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी विविध माध्यमांतून माहिती प्रसारित करण्यात येत आहे. (Shirur News)
Shirur News : करडे गावामध्ये तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Shirur News : न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल





