Unidentified Body : इंद्रायणी नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; दागिने आणि पोशाखावरून ओळख शोध सुरू
Unidentified Body : इंद्रायणी नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ; महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना.
Updated On:

Unidentified Body – देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किन्हई गावाजवळ इंद्रायणी नदीपात्रात एक अज्ञात महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मृत महिलेचे वय अंदाजे ४० वर्षे आहे. उंची सुमारे ५ फूट २ इंच आहे. वर्ण सावळा असून शरीरयष्टी मध्यम आहे. केस काळे-पांढरे आणि लांब आहेत. चेहरा उभट आहे. महिलेच्या अंगावर काळ्या रंगाचा कुर्ता आणि ब्लाउज होता.
उजव्या पायात पैंजण होते. डाव्या हातात पिवळ्या रंगाची बांगडी आढळली आहे. या महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने देहूरोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





