जागतिक वारसा स्थळाकरीता युनोस्कोची “प्रतापगडाला” भेट

पाचगणी । छत्रपती शिवरायांच्या अजरामर शोर्याचे प्रतीक असलेल्या “प्रतापगड” किल्ल्याचा . जागतीक वारसास्थळात समावीष्ट होण्याकरीता . जागतीक युनोस्को समीतीने भेट दिली . जागतीक युनोस्को संघटनेचे हेवजॅाग ली यांच्यासह महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे डॅा विलास लहाने ,शिखा जैन हे प्रमुख प्रतिनीधी युनोस्क समितीला मार्गदर्शन करण्याकरीता प्रतापगडावर उपस्थित होती .
जागतीक स्तरावर वल्ड हेरीटेज साईड प्रसिद्ध केली जात आहे. सदर हेरीटेज साईडच्या माध्यमांतुन युनोस्कची समीती भेट देत आहे . महाराष्ट्र राज्यातील ११ किल्ले तर तामिळनाडुतील १ किल्ला अशा बारा गडांचा युनोस्कोच्या समितीच्या पाहणीकरीता समाविष्ठ करण्यात आला आहे.
जागतिक युनोस्कच्या समितीला महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाने प्रतापगड किल्ल्याचा चप्पा चप्पा फिरवुन युनोस्कोच्या हेवजॅांग ली यांना फुरवुन दाखवला . विविध ठीकाणी स्थळपाहणी करताना अजरामर शोर्याच्या किल्ल्याच्य विविध पैलुंच अभ्यासपुर्ण विवेचन युनोस्क समीतीकडे सादर करण्यात येत होत.
युनोस्क समीतीच्या प्रमुखांनी स्थानिक गावकर-यानबरोबक देखील चर्चा केली . युनोस्कच्यी समीतीने अफजल खानाची कबर देखीस पाहुन तेथील सर्व गोष्टी पाहुन घेत पुढचा प्रवास करत मार्गस्थ झाले.
यावेळी प्रांतअधिकारी वाई राजेंद्र कचरे , तहसिलदार तेजस्वीनी कोचरे पाटील ,विनक्षेत्रपाल महाबळेश्वर महांगडे, उपअभियंता अजय देशपांडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक रौफ इनामदार यांच्यासह विविध विभागातील खाते प्रमुख उपस्थीत होते .





