Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन ‘छोटा राजन’ एम्समध्ये दाखल; परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त !

Chhota Rajan : तिहार तुरुंगात असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दिली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. छोटा राजनवर नाकाची छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान, छोटा राजनला एम्समधील ज्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आहे, त्याठिकाणी दिल्ली पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, छोटा राजनच्या नाकाची छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर पोलिस डॉक्टरांचा सल्ला घेतील. त्यानंतर त्याला पुन्हा तिहार तुरुंगात नेले जाईल. छोटा राजनवर अनेक गुन्हे दाखल आहेत.
२००१ मध्ये एका हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे अनेक शत्रू आहेत. त्यामुळे रुग्णालयात त्याची सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे.
कोणालाही त्याला भेटण्याची परवानगी नाही. फक्त डॉक्टरच त्याच्याशी उपचारांबद्दल चर्चा करू शकतात. वॉर्डच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात आहेत. सुरक्षेची कारणे लक्षात घेऊन छोटा राजन नेहमी पोलिसांच्या निगराणीखाली असतो.





