मुंबई – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारला पाहिजे आणि आपला अधिकार हिसकावून घेण्याचा पण केला पाहिजे असं आवाहन केलं आहे. त्यांनी याचसंदर्भातील व्हिडिओ सोशलवर मीडियावर शेअर केला असून काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना ‘हे’ होऊ द्यायचं नाही असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर यांची सोशल मीडिया पोस्ट
‘पराक्रमाचा इतिहास बहुजन बांधवांना कळाला तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ, आमचा राजकीय हक्क मागू ते काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाहीये. हा डाव आपण ओळखला पाहिजे. मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारला पाहिजे. ।जय मल्हार।’