Sharad Pawar Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अनिश्चिततेचं सावट; पवारांची गाडी कुठे अडकली? घोडं कोणामुळं अडलं?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार का, यावर सध्या मोठं अनिश्चिततेचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विलीनीकरणास ठाम विरोध दर्शवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पटेल यांना स्थान मिळू शकतं, मात्र विलीनीकरण झाल्यास ही संधी सुळे यांच्याकडे वळू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जयंत पाटील यांच्या मंत्रिपदावरही चर्चा रंगली असून, त्यांना स्थान दिल्यास तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, विलीनीकरणाची गती सध्या थांबलेली दिसत असून, काका-पुतण्यांच्या ‘एकत्र येण्याचा मुहूर्त’ सध्या तरी लांबणीवर पडल्याचं चित्र राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.
राजकीय भूकंपाच्या प्रतिक्षेत महाराष्ट्र?
पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय कोणत्या दिशेने जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





