Unauthorized banner: दादा आणि साहेब यांची वाट पाहात आहोत
Unauthorized banner:

नगरसेवक पांडे यांनी स्वत:हून फ्लेक्स काढल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया
अनधिकृत बॅनर, फ्लेक्सबाबत १८८२ तक्रारी दाखल
Unauthorized banner: महापौरांसह विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांच्या लावलेल्या फ्लेक्सही प्रशासनाकडून लक्ष्य करण्यात आले आहे. अनधिकृत बॅनर, फ्लेक्सच्या आजपर्यंत १८८२ तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत.
पीएमसी केअरवर नागरिकांनी या तक्रारी फोटोसह टाकल्या आहेत. महापालिकेच्या ऍपवर ज्या ज्या लोकप्रतिनिधींच्या फ्लेक्स आणि बॅनर्सच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांची माहिती देऊन नगरसेवकांनी केलेल्या विद्रुपीकरणाचे क्रमांकही काढले जात आहेत.
महापौरांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या ड्रेनेजच्या कामाचे फ्लेक्स लावल्याची तक्रार पीएमसी केअरवर आली आहे. त्यावर फ्लेक्सची तसदी कशाबद्दल, असा प्रश्न असून, एक्स हॅण्डलवरचा फोटो प्रशासनाने टाकला आहे.
भाजपचे नगरसेवक सुनील पांडे यांचे नाव विद्रुपीकरणाच्या तक्रारीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनी गुरुवारी स्वत:हून फ्लेक्स काढून घेतले. त्याचे फोटो आणि त्याखाली फ्लेक्स लावायला कार्यकर्ते होते, काढायला मात्र भाऊ स्वत: आले. पांडे यांचे अभिनंदन पुरस्कार परत घेतला आहे. दादा आणि साहेब यांची वाट पाहात आहोत, असा मजकूर लिहिला आहे.
विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी या कारवाईला पाठिंबा देत स्वत:चे फ्लेक्सही काढून घेईन, असे सांगितले होते. त्यांच्यासाठी पाठिंब्याबद्दल आभार. सर्व बॅनर काढून झाले की कळवावे. या वेळी लेखी नको, फोटो चालेल, अशी कमेंट आली आहे.
आम्ही नागरिकांसोबत असा फ्लेक्स काँग्रेस गटनेते चंदूशेठ कदम यांनी लावला आहे. हा फोटोही नागरिकांनीच पाठवल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे ज्यांनी ते काढून घेतले नाहीत, ते नेते आता प्रशासन बॅनर, पोस्टर काढण्याची वाट पाहणार की, स्वत:हून काढून घेणार, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
राजकारण्यांना वेगळा आणि जनतेला वेगळा न्याय असतो, अशा जनतेच्या भावना होत्या. आता अतिक्रमणविरोधी कारवाई सगळ्यांसाठी आहे, हे दिसून आले आहे. माझ्या नावाचा फ्लेक्स ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी लावला होता, तो काढला. जनतेच्या पैशांतून जे काम लोकप्रतिनिधी करतात, त्याची माहिती जनतेला द्यायची असेल, तर प्रशासनाची मान्यता घेतली पाहिजे.
– मंजुषा नागपुरे, महापौर





