T20 World Cup | नेट गोलंदाज म्हणून उमरान मलिकची निवड

नवी दिल्ली – आयपीएल 2021 स्पर्धेत वेगवान गोलंदाजीने सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या जम्मू-काश्मीरचा गोलंदाज उमरान मलिकची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. उमरान मलिक सनराइजर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे.
टी 20 वर्ल्डकप संघात उमरानची निवड नेट गोलंदाज म्हणून केली आहे. तो भारतीय संघासोबत असणार आहे. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. फलंदाजांना नेटमध्ये त्याच्या गोलंदाजीचा सामना करणे एक चांगला अनुभव ठरेल.
त्याचबरोबर त्यालाही अनुभव मिळेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना गोलंदाजी करताना त्याच्या अनुभवात वाढ होईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, उमरान मलिकने आतापर्यंत जम्मू काश्मीरसाठी फक्त एक लिस्ट ए एकदिवसीय आणि एक टी 20 सामना खेळला आहे. 21 वर्षीय उमरान याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीतून टी 20 पदार्पण केले होते. यात त्याने 24 धावा देत 3 गडी बाद केले होते.





