#RanjiTrophy : मैदानी पंच सी. शमसुद्दीन जखमी
Updated On:

राजकोट – रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना राजकोट येथे 9 मार्चपासून सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळादरम्यान पंच सी शमसुद्दीन यांना खेळाडूने फेकलेला चेंडू लागला.
उपचारानंतर टीव्ही पंचम्हणुन नियुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी यशवंत बारडे यांची मैदानावरील पंचम्हणुन नेमणूक करण्यात आली आहे. मात्र बरडे येथे दाखल झालेले नव्हते त्यामुळे के. एन. अनंतपद्मनाभन यांनी दोन्ही बाजूने पंचम्हणुन काम पाहिले.
आता तिसऱ्या दिवसाच्या खेळात यशवंत बर्डे व पद्मनाभन मैदानी पंच म्हणून काम पाहणार आहेत. शमशुद्दीन यांना प्राथमिक चाचणीनंतर एक आठवडा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचे सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.





