DC vs MI सामन्यात अंपायरने अचानक हार्दिक पंड्याची बॅट का चेक केली? पाहा VIDEO

Umpire checking Hardik Pandya’s bat during DC vs MI match : आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्लीला विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ केवळ १९३ धावांवरच गारद झाला. दिल्ली कॅपिटल्सचा हा पाच सामन्यांतील पहिला पराभव होता. दुसरीकडे, पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा सहा सामन्यांमधील हा दुसरा विजय होता. दरम्यान या सामन्यात अंपायरने हार्दिक पंड्याची बॅट तपासली, काय होतं कारण जाणून घेऊया.
या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याच्या बॅटची तपासणी करण्यात आली. कारण अंपायरला बॅटचा आकार आयपीएल स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे की नाही याची खात्री करायची होती. अंपायरने यासाठी गेजचा वापरला केला. अंपायरने हार्दिक पंड्याची बॅट गेजमध्ये घालून तपासली, जेणेकरून ती बॅट कोणत्याही अडचणीशिवाय त्यातून जाईल.
अंपायरने हार्दिक पंड्याची बॅट का चेक केली?
🔥 Unreal Moment in IPL 2025! 🔥
Umpire checks Hardik Pandya’s bat before his explosive entry! 💪🏏
#IPL2025 #HardikPandya pic.twitter.com/KoSe5HAVq0
— Cricket Chronicles (@CricketChroni) April 14, 2025
आयपीएलच्या नियमांनुसार बॅटचा आकार कसा असावा?
आयपीएलच्या नियमांनुसार, बॅटची रुंदी ४.२५ इंच (किंवा १०.८ सेंटीमीटर) पेक्षा जास्त नसावी. कडा १.५६ इंच (किंवा ४.० सेमी) पर्यंत आणि खोली २.६४ इंच (६.७ सेमी) पर्यंत असावी. बॅट या सूचनांचे पालन करणारी आहे की नाही हे तपासण्यासाठी अंपायर बॅटला गेज उपकरणातून घालून पाहिली जाते.
हेही वाचा – Ayush Mhatre : मुंबईचा युवा खेळाडू घेणार ऋतुराजची जागा, कोण आहे? जाणून घ्या
यंदा आयपीएलमध्ये बऱ्याचदा हाय स्कोअरिंग सामने पाहायला मिळत आहेत. अंपायर हे नियम काटेकोरपणे पाळत आहेत. जेणेतकरुन नियमांविरुद्ध जाऊन फलंदाज अन्याय्य फायदा घेत आहेत का हे अंपायर तपासतात. फलंदाज खूप रुंद किंवा खूप जाड बॅट वापरत आहे का? परंतु हार्दिक पंड्या हा पहिला खेळाडू नाही ज्याची बॅट मैदानावर अशा प्रकारे अंपायरनी तपासली आहे. त्याच्या आधी, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात, फिल साल्ट आणि शिमरॉन हेटमायर यांच्या बॅटचीही अंपायरने तपासणी केली होती.





