Russia Ukraine War : रशियन सैन्याच्या हल्ल्यात प्रसिद्ध युक्रेनियन अभिनेत्रीचा मृत्यू

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात सैनिकांसोबतच नागरिकही या युद्धाचे शिकार बनत आहेत. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. युक्रेनची अभिनेत्री ओक्साना श्वेट्स देखील रशियन हल्ल्याची बळी ठरली आहे. यंग थिएटरच्या 67 वर्षीय अभिनेत्री ओक्साना श्वेट्सचा रशियातील कीव येथे झालेल्या रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
ओक्साना श्वेट्सच्या मृत्यूची बातमी यंग थिएटरकडून देण्यात आली आहे. निवासी इमारतीवर रशियन रॉकेट हल्ल्यात अभिनेत्री ओक्साना श्वेट्सचा मृत्यू झाला आहे. ओक्साना यांना श्रद्धांजली वाहत यंग थिएटरकडून युद्धाबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात आली.
The actress of the Young Theatre Oksana Shvets has been murdered in Kyiv during the war. pic.twitter.com/Rp3DcgSbge
— KyivPost (@KyivPost) March 17, 2022
ओक्साना श्वेट्स ह्या युक्रेनमधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. ओक्साना यांना युक्रेनच्या सन्मानित कलाकार या देशाच्या सर्वोच्च कलात्मक पुरस्काराने सन्मान करण्यात आले होते. त्यांनी इव्हान फ्रँको थिएटर आणि कीव स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ थिएटर आर्ट्समध्ये शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी टेर्नोपिल म्युझिक अँड ड्रामा थिएटर आणि कीव थिएटर ऑफ सॅटायरमध्येही काम केले होते.





