Russia-Ukraine war : सैनिकांचे मृतदेह परत देण्यास युक्रेनकडून दिरंगाई; रशियाने पुन्हा केला आरोप

मॉस्को – युक्रेनविरोधात लढणाऱ्या रशियाच्या ६ हजार निकांचे मृतदेह परत मिळालेले नसल्याचे रशियाने म्हटले आहे. युक्रेन आणि रशियामध्ये जखमी सैनिक आणि मृत सैनिकांचे मृतदेह परत देण्याचा निर्णय झाला आहे.
मात्र ही प्रक्रिया युक्रेनकडून लांबणीवर टाकली जाते आहे. या आदलाबदलीला युक्रेन दिरंगाई करत असल्याचा आरोप रशियाने रविवारी पुन्हा एकदा केला. क्रेनबरोबरच्या वाटाघाटींमध्ये रशियाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लेफ्टनंट जनरल अलेक्झांडर झोरिन यांनी हा आरोप केला आहे.
सैनिक णि मृतदेहांच्या आदलाबदलीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यातील युक्रेनच्या १,२१२ सैनिकांचे मृतदेह रशियाने परत दिले आहेत. मात्र त्याला युक्रेनकडून अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. आता मृतदेहांची आदलाबदल करण्याची प्रक्रिया पुढीलआ आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकली जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
रशियाच्या सैनिकांचे मृतदेह परत देण्याबाबत कोणतीही निस्चित कालमर्यादा ठरली नसल्याचे कारण युक्रेनकडून देण्यात येते आहे. मृतदेह आदलाबदलीला उशीर होण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
युद्धात मारल्या गेलेल्या ६ हजार सैनिकांच्या मृतदेहांच्या आदलाबदलीच्या प्रक्रियेबाबत सोमवारी इस्तंबुलमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंचे एकमत झाले होते. याशिवाय चर्चेमध्ये युद्ध समाप्त करण्याविषयी काहीही ठोस निर्णय होऊ शकलेला नव्हता.





