उफ्फ तेरी अदा..! ‘रकुल प्रीत’चा बोल्ड अंदाज चर्चेत; फोटो पाहून फॅन्स म्हणाले…

Updated On:
Photo 1

मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. रकुलने 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे.

मात्र, रकुलचा शेवटचा चित्रपट ‘थँक गॉड’ हा होता. त्यानंतर अभिनेत्रीचा अद्याप कोणताच चित्रपट रुपेरी पडद्यावर आला नाही. थँक गॉड या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंहसोबत अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत होते. दरम्यान, नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रीने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

सध्या अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, फॅन्स देखील तिच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्स करत आहेत. रकुल प्रीत ही बॉलिवूडमधील एक आघाडीची नायिका असून, फॅन्सच्या मनात तिने आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत तिची जादू चालवली आहे.

कधी चित्रपटांमुळे, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी लूकमुळे ती चर्चेत येते. रकुल इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. यावेळी तिने तिच्या ख्रिसमस वीकेंडची झलक दाखवली आहे. ताज्या फोटोंमध्ये रकुलने पांढऱ्या रंगाचा सिल्कचा शॉर्ट ड्रेस परिधान केला असून, यामध्ये ती कमालीची मादक आणि हॉट दिसत आहे.

रकुलने तिच्या लुकला न्यूड चमकदार मेकअपने पूर्ण केले आहे. यासोबत तिने डायमंडचे कानातले कॅरी केले आहेत. सध्या तिचे हे नवीन फोटो सगळीकडे धुमाकूळ घालत असून, फॅन्सला देखील अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज आवडला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ