Udhayanidhi Stalin : तामिळनाडूत मोठा गोंधळ ! उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ; अभिनेत्री त्रिशावरील ‘ते’ वक्तव्य भोवलं
Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन वादात सापडले आहेत. एका सभेदरम्यान अभिनेत्री त्रिशाबद्दल कथितरित्या अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे.

Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन वादात सापडले आहेत. एका सभेदरम्यान अभिनेत्री त्रिशाबद्दल कथितरित्या अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. या घटनेप्रकरणी त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर सहा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
उदयनिधी यांनी याविषयी बोलताना, “मी काही चुकीचे बोललो का? मी कोणाचे नाव घेतले का? मला यावर अधिक भाष्य करायचे नाही.” असे म्हणत आपली बाजू मांडली आहे.
तामिळनाडू पोलीस त्यांना घेऊन जात असताना, त्यांनी सांगितले की, पोलिसांची ही कारवाई सूडबुद्धीने केलेली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्टॅलिन यांनी अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज दुपारी होणार आहे. (Udhayanidhi Stalin)
उदयनिधी स्टॅलिन कावेरी पाणी तंटा वादावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान जमावाला संबोधित करत होते. आंदोलनादरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री विजय यांना लक्ष्य केले आणि तामिळनाडूसाठी कावेरीच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली. (Udhayanidhi Stalin)

Udhayanidhi Stalin : तामिळनाडूत मोठा गोंधळ ! उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ; अभिनेत्री त्रिशावरील ‘ते’ वक्तव्य भोवलं
त्यानंतर जमावाने “त्रिशा, त्रिशा!” अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. असे म्हटले जात आहे की, यावेळी स्टॅलिन यांनी जमावाला विचारले की ते त्रिशासाठी घोषणा का देत आहेत आणि द्विअर्थी वक्तव्य करत अश्लील हावभाव केला. (Udhayanidhi Stalin)
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर आता तीव्र टीका होत आहे. सत्ताधारी टीव्हीके पक्षाने डीएमके नेत्यावर टीका केली असून माफीची मागणी केली आहे. टीव्हीके नेते अधव अर्जुन यांनी उदयनिधींवर राजकारणाचा स्तर खाली आणल्याचा आणि एका महिलेचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांना अश्लील म्हटले आहे.
त्यांनी उदयनिधींच्या भाषणाला अश्लील आणि द्विअर्थी म्हटले असून, डीएमके नेते आपल्या अश्लील भाषेने आणि द्व्यर्थी भाषणांनी अण्णादुराई यांचे आंदोलन आणि त्यांची प्रतिष्ठा नष्ट करत आहेत, असे म्हटले आहे.





